उपमुख्यमंत्री अजित पवार व राम शिंदे यांचे अंबालिका वर गुप्तगू ;परिसरात चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 15:54 IST2021-06-12T15:54:00+5:302021-06-12T15:54:58+5:30

सिद्धटेक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी अंबालिका शुगर (ता. कर्जत) येथे आज भेट घेतली.  सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेचा तपशील अद्याप मिळाला नसला तरी या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar and Ram Shinde's secret talks on Ambalika; | उपमुख्यमंत्री अजित पवार व राम शिंदे यांचे अंबालिका वर गुप्तगू ;परिसरात चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार व राम शिंदे यांचे अंबालिका वर गुप्तगू ;परिसरात चर्चेला उधाण

सिद्धटेक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी अंबालिका शुगर (ता. कर्जत) येथे आज भेट घेतली.  सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेचा तपशील अद्याप मिळाला नसला तरी या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

ही भेट कर्जत -जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्यासाठी चुलते अजित पवार यांनी काही सोईस्कर मार्ग काढण्यासाठी की आणखी काही? राम शिंदे यांना खासदारकीची ऑफर? राम शिंदे ही महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. मग त्यांचा काय निरोप घेऊन तर अजित पवारांना भेटले नाहीत ना ? ही भेट म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीची नांदी तर नाही ना ? अशा सर्व चर्चा राजकीय क्षेत्रात चालू आहेत .

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar and Ram Shinde's secret talks on Ambalika;