आघाडीला सत्तेतून हटवा

By Admin | Updated: October 6, 2014 23:56 IST2014-10-06T23:52:09+5:302014-10-06T23:56:37+5:30

जामखेड/करंजी/अकोले : दरोडेखोर आघाडीतील नेत्यांच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका, असे आवाहन आ़ पंकजा मुंडे-पालवे यांनी केले़

Delete from the alliance | आघाडीला सत्तेतून हटवा

आघाडीला सत्तेतून हटवा

जामखेड/करंजी/अकोले : काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली असून, उद्योगधंदे रसातळाला गेले़ महिला असुरक्षित असून, ५० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ अशा दरोडेखोर आघाडीतील नेत्यांच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका, असे आवाहन आ़ पंकजा मुंडे-पालवे यांनी केले़
पांढरीपूल येथे भाजपाचे उमेदवार शिवाजी कर्डिले व बाळासाहेब मुरकुटे तसेच जामखेड येथे प्रा़ राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना मुंडे यांनी राष्ट्रवादी-काँगे्रसवर जोरदार टीका केली़ मुंडे म्हणाल्या, दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी लढा दिला़ त्यांचीच प्रेरणा घेऊन मी सामान्य माणसांसाठी काम करीत आहे़ राष्ट्रवादी-काँगे्रस सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला़ राष्ट्रवादीने ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, असा आरोप मुंडे यांनी केला़ राज्यातील उद्योगधंदे मेटाकुटीला आलेले असतानाही आघाडी सरकार राज्य नंबर वन असल्याची जाहिरातबाजी करीत आहे़ गेल्या १५ वर्षात राज्यात गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून, महिला असुरक्षित आहेत़ गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे अश्रू पुसण्यासाठी मी राज्यभर सभा घेत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले़
पांढरीपूल येथील सभेस बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, विठ्ठलराव चाटे, अभय आव्हाड, मिर्झा मनियार, बाजीराव गवारे, विक्रम तांबे, नानासाहेब गागरे, विठ्ठल बिडकर, बाळासाहेब जठार, उदय पाटील आदी उपस्थित होते़ तर जामखेड येथील सभेस नामदेव राऊत, राजेंद्र देशमुख, सूर्यकांत भोंदे, डॉ़ भगवान मुरुमकर, विठ्ठलराव राऊत, रिपाइं जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, विलास मोरे, मनोज राजगुरु, डॉ़ ज्ञानेश्वर झेंडे, बाजीराव गोपाळघरे, फिरोज पठाण, अर्चना राळेभात, सुवर्णा पाचपुते, सचिन बागवान, सुधाकर काळे, नारायण जाधव, जयेश जाधव, आजिनाथ नन्नवरे, बबनराव पवार आदी उपस्थित होते़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Delete from the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.