शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणीस नकार दिल्याने दाम्पत्याला मारहाण

By admin | Updated: September 4, 2016 00:03 IST

अहमदनगर : गणपतीची वर्गणी व हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांना सहा ते सात जणांनी जबर मारहाण केली़ या घटनेत दुकानदार राजू शिवाजी पाटोळे हे गंभीर जखमी झाले

अहमदनगर : गणपतीची वर्गणी व हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारासह त्याच्या कुटुंबीयांना सहा ते सात जणांनी जबर मारहाण केली़ या घटनेत दुकानदार राजू शिवाजी पाटोळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ शहरातील सिद्धार्थनगर येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ मारहाणीनंतर पाटोळे हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले असता आरोपींनी तेथे जाऊनही त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली़ घटनेनंतर पाटोळे यांचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली नाही़ उलट ज्यांनी मारहाण केली़ त्यांची फिर्याद मात्र, तातडीने दाखल करून घेतल्याने तोफखाना पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत आहे़ सदर घटना घडल्यानंतर पोलिसांनी शनिवारी रुग्णालयात जाऊन जखमी पाटोळे यांचा जबाब घेतला त्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली़ राजू पाटोळे यांचे सिद्धार्थ नगर येथील करंदीकर रुग्णालयाजवळ इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे दुकान आहे़ या ठिकाणी शुक्रवारी साडेसात वाजेच्या सुमारास विजय पठारे, संजय पठारे, गणेश घोरपडे व सागर साठे यांच्यासह चार ते पाच जणांनी येऊन पाटोळे यांना गणपती मंडळाची पाच हजार रुपयांची वर्गणी तसेच महिन्याला ६०० रुपये हप्ता मागितला़ हे पैसे देण्यास पाटोळे यांनी नकार दिल्याने आरोपींनी पाटोळे यांच्या दुकानाची तोडफोड करत त्यांना लाकडी दांडा व लोखंडी गजाने मारहाण केली़ यावेळी मध्ये सोडविण्यास गेलेल्या पाटोळे यांची पत्नी मनिषा, मुलगा ऋषीकेश व कुणाल यांनाही मारहाण करण्यात आली़ घटनेनंतर पाटोळे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तेथेही आरोपींनी येऊन पाटोळे कुटुंबीयांना मारहाण करून दहशत निर्माण केली़ या मारहाणीत पाटोळे हे गंभीर तर इतर जण किरकोळ जखमी झाले आहेत़ दरम्यान राजू पाटोळे यांच्या फिर्यादिवरून विजय पठारे, संजय पठारे, गणेश घोरपडे व सागर साठे (सर्व रा़ सिद्धार्थनगर) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी मात्र, यातील एकाही आरोपीला अटक केलेली नाही़ दरम्यान या घटनेनंतर विजय राजू पठारे यानेही तोफखाना पोलीस ठाण्यात राजू पाटोळे, संदीप पाटोळे, वैभव पाटोळे, विशाल पाटोळे यांच्या विरोधात फिर्याद देत लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे़ सिद्धार्थनगर येथे मारहाणीच्या घटनेनंतर चार ते पाच जणांनी जिल्हा रुग्णालयात येऊनही दहशत निर्माण करत खुर्च्यांची फेकाफेक करून मारहाण केली़ ही घटना रुग्णालयातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे़ (प्रतिनिधी)