कर्जतच्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:28+5:302021-08-15T04:23:28+5:30
कर्जत : येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आले. ...

कर्जतच्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
कर्जत : येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अडीच कोटी रुपये खर्चाच्या या प्लांटसाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता. येथून दररोज २५० सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, पंचायत समितीच्या सभापती मनीषा जाधव, उपसभापती राजेंद्र गुंड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, सेनेचे तालुकाप्रमुख बळिराम यादव, सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती उमेश परहर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, डॉ. शबनम इनामदार, सतीश पाटील, सचिन कुलथे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळेे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, वैद्यकीय अधीक्षक कुंडलिक अवसरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप पुंड, आदी उपस्थित होते.
---
१४ कर्जत ऑक्सिजन
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकार्पण केले. यावेळी आमदार रोहित पवार, राजेंद्र फाळके व इतर मान्यवर उपस्थित होते.