कवटेवाडीत आढळला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:09 IST2020-06-27T16:08:42+5:302020-06-27T16:09:15+5:30
संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील कवटेवाडी शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात एका चरामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.

कवटेवाडीत आढळला कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह
घारगाव : संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथील कवटेवाडी शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात एका चरामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.
जवळे बाळेश्वरच्या कवटेवाडी येथील वनविभागाच्या सर्व्हे नंबर २६८ मध्ये काही मजूर काम करत होते. यावेळी त्यांना एका चरामध्ये अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. याबाबत त्यांनी लगेच वनरक्षक कडनर यांना कळविले.
पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष खैरे, विशाल कर्पे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ६० ते ६५वयोगातील महिलेचा मृतदेह असून तिच्या अंगावर हिरव्या रंगाची ठिपक्याची साडी आहे.
घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले करत आहेत.