तंटामुक्त समिती अध्यक्ष ठरविण्यावरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:58+5:302021-09-09T04:26:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीगोंदा : तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात तंटामुक्त समितीचा अध्यक्ष ठरविण्याच्या विषयावरून ग्रामसभेत वाद झाला. सभेच्या अध्यक्षा ...

तंटामुक्त समिती अध्यक्ष ठरविण्यावरून
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात तंटामुक्त समितीचा अध्यक्ष ठरविण्याच्या विषयावरून ग्रामसभेत वाद झाला. सभेच्या अध्यक्षा व त्या गावच्या महिला सरपंच यांना आठ जणांनी जबर मारहाण केली. लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना येळपणे जिल्हा परिषद गटातील एका गावात घडली.
महिला सरपंच यांच्या फिर्यादीवरून विलास तुकाराम महाडिक, राहुल सोपान महाडिक, नितीन सोपान महाडिक, संकेत भीमा महाडिक, अनिल दशरथ महाडिक, राजू बाबुराव कातोरे, दशरथ बाबुराव कातोरे, दिलीप तुळशीराम कातोरे या आठ जणांवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.८) ग्रामसभा घेण्यात आली. मात्र या ग्रामसभेमध्ये तंटामुक्तीच्या अध्यक्षाच्या निवडीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. महिला सरपंचास लक्ष करण्यात आले. यात महिला सरपंचांना मारहाण करण्यात आली.