चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील पेट्रोल पंपामागील तलावामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.हा मृतदेह तलावात आला कसा, हा घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू आहे, याबाबत उलट सुलट चर्चा परिसरामध्ये रंगल्या आहेत़ हा मृतदेह अनोळखी असल्याचे गावकºयांनी सांगितले़ घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला़ याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे़ ओळख पटल्यानंतर पुढील तपासाला दिशा मिळणार आहे़ पोलीस नाईक शेलार हे अधिक तपास करीत आहेत़
टाकळी काझीच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:20 IST