शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

वाळूतस्कराची शुल्क निरीक्षकास धक्काबुक्की

By admin | Updated: January 14, 2016 23:05 IST

अहमदनगर: गौण खणिज विभागाने औरंगाबाद महामार्गावर वाहन आडवे लावून वाळूचा डंपर पकडला़ पकडलेला डंपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेऊन जात असताना चालकाने मध्येच वाहन थांबविले

अहमदनगर: गौण खणिज विभागाने औरंगाबाद महामार्गावर वाहन आडवे लावून वाळूचा डंपर पकडला़ पकडलेला डंपर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेऊन जात असताना चालकाने मध्येच वाहन थांबविले व धक्काबुक्की करीत कर्मचाऱ्यास जबरदस्तीने खाली उतरवून पळ काढला़ या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़जिल्ह्यातील वाळूतस्करांची मुजोरी चांगलीच वाढली आहे़ त्याचा अनुभव दस्तूर खुद्द जिल्हा खणिकर्म अधिकाऱ्यांना गुरुवारी आला़ नेवासा तालुक्यातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा खणिकर्म अधिकारी बामने यांच्या नेतृत्वाखाली पथक औरंगाबाद मार्गावरून नेवासाकडे निघाले होते़ मात्र महामार्गावरील पोखर्डी गावाच्या शिवारात उजनीकडे जाणाऱ्या चौकातून वाळूने भरलेले डंपर भरधाव वेगाने नगरकडे जात असल्याचे त्यांना आढळून आले़ बामने यांनी वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला़ मात्र चालकाने डंपर थांबविले नाही़ तो नगरच्या दिशेने निघाला़ पथकाने डंपरचा पाठलाग केला़पथकाने पुढे येऊन गजराजनगर जवळ जीप आडवी लावली व डंपर पकडून त्याची तपासणी केली़ सदर डंपरमध्ये चार ब्रास वाळू असल्याचे आढळून आले़ शिवाय डंपरवर कुठेही क्रमांक दिसून आला नाही़ विना क्रमांकाच्या डंपरमधून वाळची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बामने व त्यांच्या पथकाने नाव काय? वाळू कुठून आणली?, अशी विचारणा चालकाकडे केली़ मात्र चालकाने सांगण्यास नकार दिला़ पकडलेले वाहन बामने यांनी अनिल सदावर्ते यांच्या ताब्यात दिले व त्यांना वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले़ वाहन चालकास घेऊन सदावर्ते कार्यालयाकडे निघाले़ वाहन कार्यालयाकडे निघून गेल्याची खात्री करून बामने त्यांच्या पुढील मोहिमेवर निघाले़ काही अंतरावर आल्यानंतर चालकाने डंपर थांबविले़ शेजारी बसलेल्या शुल्क निरीक्षक सदावर्ते यांना खाली उतरण्यास सांगितले़ पण, ते उतरले नाही़ मात्र चालकाने त्यांना धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिली़दोघांत झटापट झाली़ अखेर चालकाने सदावर्ते यांना डंपरच्या खाली ढकलून दिले़ दोघांच्या झटापटीत चालकाचा भ्रमणध्वनी सदावर्ते यांच्या हाती लागला़ चालकाने डंपरमधील वाळू रस्त्याच्या बाजूला खाली केली़वाळू खाली करून चालक तेथून पसार झाला़ सदर घटनेची माहिती मिळताच बामने त्यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत़ (प्रतिनिधी)