‘मोदी सरकार, झूठ बोले बारबार’, अशा घोषणांनी दणाणले नगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:28 IST2018-04-02T13:28:04+5:302018-04-02T13:28:57+5:30
केंद्र सरकारविरोधात नगरमध्ये डॉक्टरांनी काढला मोर्चा

‘मोदी सरकार, झूठ बोले बारबार’, अशा घोषणांनी दणाणले नगर
अहमदनगर : मोदी सरकार, झूठ बोले बारबार’, अशा घोषणा देत नगरमधील डॉक्टरांनी सरकारविरोधात मोर्चा काढला. वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चास प्रारंभ झाला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
अहमदनगर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांसाठी ब्रिज कोर्स मंजूर करावा, बिगर अॅलोपॅथी डॉक्टरांच्या आधुनिक औषधांच्या वापरासाठी केलेली शिक्षेची तरतूद मागे घ्यावी, केंद्र सरकारच्या निषेधार्थ मुंबई येथील आझाद मैदानात सुरु केलेल्या उपोषणाची सरकारने तातडीने दखल घ्यावी, अशा मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत. डॉक्टरांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या मोर्चात संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ़ रणजित सत्रे, मार्गदर्शक डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. अशोक भोजणे, डॉ. विनय गरुड, डॉ. मनिष थवाणी, डॉ. अरविंद गायकवाड,डॉ. महेंद्र बेरड, डॉ. नंदेश नवले, डॉ. किरण कर्डिले, डॉ. महेश कोकाटे, डॉ. प्रदीप कळमकर यांच्यासह संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते.