शहरातील माेकाट जनावरांना लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:34+5:302021-07-27T04:22:34+5:30
अहमदनगर: महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने सोमवारी पत्रकार चौक ते दिल्लीगेट रस्त्यावरील मोकाट जनावरे पकडले असून, पकडलेली जनावरे पिंपळगाव माळवी येथील ...

शहरातील माेकाट जनावरांना लगाम
अहमदनगर: महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने सोमवारी पत्रकार चौक ते दिल्लीगेट रस्त्यावरील मोकाट जनावरे पकडले असून, पकडलेली जनावरे पिंपळगाव माळवी येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आली आहेत. तसेच मोकाट जनावरे सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहरासह उपनगरांत मोकाट जनावरे संख्या वाढली आहे. ही जनावरे वाहतुकीलाही अडथळा आणतात. मनपाच्या आरोग्य समितीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूकर यांनी शहरातील मोकाट जनावरे पकडण्याचा आदेश दिला असून, काेंडवाडा विभागाने जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोंडावाडा विभागाच्या पथकाने १६ जनावरे पकडली आहे. ही जनावरे पिंपळगाव माळवी येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहेत. शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...
मोकाट जनावरांवर महिन्याला एक लाखांचा खर्च
महापालिकेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. महापालिका दर महिन्याला ठेकेदाराला १ लाख रुपये खर्च देणार आहे. महापालिकेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे.
...
- शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पत्रकार चौक ते दिल्लीगेट मार्गावर सोमवारी चार मोकाट जनावरे पकडण्यात आली आहे.
- प्रशांत रामदिन, प्रमुख कोंडा विभाग
..
सूचना: फोटो आहे.