शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेचे निकष बदलले

By admin | Updated: June 6, 2014 01:00 IST

अहमदनगर/बाभळेश्वर : खरीप हंगामातील पिकांना लागू केलेली सर्वंकष पीक विमा योजनेत राज्य सरकारने यावर्षीपासून बदल केले आहेत़

अहमदनगर/बाभळेश्वर : खरीप हंगामातील पिकांना लागू केलेली सर्वंकष पीक विमा योजनेत राज्य सरकारने यावर्षीपासून बदल केले आहेत़ आता खरीप हंगामातील पिकांनाही फळपिकांप्रमाणेच हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे़ पहिल्या टप्प्यात ही योजना १२ जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, योजनेत सात पिकांचा समावेश करण्यात आला आहे़प्रत्येक महसूल विभागातील दोन जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांना हवामान आधारित पथदर्शी पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे़ याबाबत माहिती देताना कृषी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, राज्यातील ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून या क्षेत्राच्या कृषी उत्पादनावर हवामान घटकांचा मोठा परिणाम होत आहे़ राज्यात यापूर्वी सर्वंकष पीक विमा योजना लागू होती़ या योजनेद्वारे पीक उत्पादनावर आधारित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जात होती़ मात्र, प्रतिकूल हवामानाने पीक उत्पादन घटल्यास त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळत नव्हता़ हवामानात सातत्याने बदल होत असल्यामुळे शेतकर्‍यांना वारंवार नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत होते़ त्यामुळे खरीप हंगामातील पिकांनाही हवामानावर आधारित पीक विमा योजना लागू करण्याचे सरकारच्या विचाराधीन होते़ याबाबतचा शासननिर्णय नुकताच लागू करण्यात आला आहे़ पहिल्या टप्प्यात विमा योजनेची अंमलबजावणी १२ जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले़या पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत ३० जून असून या योजनेच्या माहितीसाठी शेतकर्‍यांनी स्थानिक कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विखे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

राज्यातील ठाणे, रायगड, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, लातुर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा या बारा जिल्ह्यांचा यात समावेश करण्यात आला आहे़भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे़ अपुरा आणि अती!अपुरा पाऊस, पावसातील खंड व अती पाऊस या तीन घटकांच्या धोक्यापासून शेतपिकांना या योजनेअंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे़ ४स्वयंचलीत हवामान केंद्राव्दारे हवामानातील बदलाची नोंद करण्यात येणार आहे़