दगडफेक प्रकरणी ४० जणांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: June 19, 2014 00:10 IST2014-06-18T23:39:52+5:302014-06-19T00:10:38+5:30
अहमदनगर : फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री दगडफे क करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर दोघांना अटक करण्यात आली आहे.

दगडफेक प्रकरणी ४० जणांवर गुन्हे दाखल
अहमदनगर : फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री दगडफे क करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास २० ते २५ जणांचा जमाव कापडबाजारात शिरला. जमाव नालबंद खुंट, पारशा खुंटमार्गे जुना कापडबाजारात शिरला आणि त्यांनी २० ते २५ दुकानांची तोडफोड केली. काही दुकानात घुसून दुकानदारास दमदाटी, शिवीगाळ करून दगडफेक करण्यात आली. दुकानामध्ये संगणकाच्या साहित्याची तोडफोड करण्यात आली. जुन्या कापडबाजारात दुकानाच्याबाहेर उभ्या असलेल्या दुकानदारांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या काचाची तोडफोड केली. जुना मंगळवार बाजार येथील समाधान वॉईन शॉप या दुकानात माजीद असिफ खान आणि जहिद बादशाह खान (रा. पंचपीर चावडी) व त्याच्या दोन अनोळखी साथीदार यांनी दुकानात घुसून काहीएक कारण नसताना शिवीगाळ केली तसेच दमदाटी केली. माजीद खान याने हातात काचेची बाटली धरून दुकानाचा मॅनेजर किशोर अंतुनात चव्हाण याच्या डोक्यात मारून जखमी केले.
दुकानाच्या साहित्याची चोरी केली. दुकानाच्या बाजूला उभा असलेला दिगंबर त्रिभुवन यास मारहाण केली. या दोन्ही घटनेप्रकरणी किशोर चव्हाण (वय ५०, मॅनेजर, मूळ रा. सिबलापूर, ता. संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुसऱ्या एका घटनेत पवन ईश्वरलाल गांधी (वय २८, रा. आनंदधाम, खिस्त गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दमदाटी, शिवीगाळ, दगडफेक करून दुकानातील साहित्याची चोरी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ते अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र टाकल्याप्रकरणी फेसबुकवरील गुप अडमिन शेख कलिम शेख सिराजोद्दीन (वय २२, रा. मांजरी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)