Crime News: आता लाचही ऑनलाईन! तलाठ्याने घेतली फोन पे वर पाच हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 12:50 IST2023-02-25T12:49:46+5:302023-02-25T12:50:51+5:30

Crime News: खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार काढून देण्याच्या बदल्या तलाठ्याने चक्क फोन पे वरच पाच हजार रुपयांची लाज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामेश्वर भागवत गोरे (तलाठी, सजा खांडके, ता.नगर )असे  तलाठ्याचे नाव आहे.

Crime News: Now bribe online! Talatha took a bribe of five thousand on phone pay | Crime News: आता लाचही ऑनलाईन! तलाठ्याने घेतली फोन पे वर पाच हजारांची लाच

Crime News: आता लाचही ऑनलाईन! तलाठ्याने घेतली फोन पे वर पाच हजारांची लाच

- अण्णा नवथर 
अहमदनगर - खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार काढून देण्याच्या बदल्या तलाठ्याने चक्क फोन पे वरच पाच हजार रुपयांची लाज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामेश्वर भागवत गोरे (तलाठी, सजा खांडके, ता.नगर )असे  तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी त्यांचे ४८ गुंठे जमीन दुसऱ्याला विकली होती. जमीन विक्रीची नोंद शासकीय अभिलेखात करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांनी घेतलेली होती. त्यानुसार त्यांनी तलाठी  गोरे यांच्याकडे अभिलेखात बदल करून फेरफार मिळण्याची मागणी केली असता तलाठ्याने  पाच हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केल्यानंतर या विभागांनी नगरमधील सुरभी हॉस्पिटल चौकात सापळा लावला असता तलाठी हा चौकात आला व त्याने तक्रारदार यांच्याकडून फोन पे वर पाच हजार रुपये घेतले.

Web Title: Crime News: Now bribe online! Talatha took a bribe of five thousand on phone pay