माजी खासदार दिलीप गांधींच्या अडचणी वाढल्या; नगर अर्बन बँकेतील अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 20:02 IST2020-12-22T18:56:17+5:302020-12-22T20:02:47+5:30
former MP Dilip Gandhi News: नगर अर्बन बँकेतील तीन कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.

माजी खासदार दिलीप गांधींच्या अडचणी वाढल्या; नगर अर्बन बँकेतील अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
अहमदनगर : नगर अर्बन बँकेतील तीन कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बँकेच्या मुख्य शाखेचे शाखाधिकारी मारुती रंगनाथ औटी यांनी फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०१७ ते नोव्हेंबर २०१७ याकाळात अपहार केल्याचा आरोप आहे. माजी खासदार गांधी यांच्यासह घनशाम अच्युत बल्लाळ, आशुतोष लांडगे व बँकेचे तत्कालीन संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी बँकेचे सभासद राजेंद्र गांधी यांच्यासह पोपट लोढा, भैरवनाथ वाकळे, मनोज गुंदेचा, अनिल गटणी, रवींद्र सुराणा, ऋषिकेश आगरकर यांनी बँकेच्या प्रशासकांच्या दालनात केले होते आंदोलन होते. माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.