गावविकासाचा आराखडा तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:33+5:302021-02-15T04:19:33+5:30
अकोले तालुक्यातील चितळवेढे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक आणि सरपंच, उपसरपंच निवडणूक बिनविरोध केल्यानंतर ग्रामस्थांचे कौतुक करत विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात नवनिर्वाचित ...

गावविकासाचा आराखडा तयार करा
अकोले तालुक्यातील चितळवेढे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक आणि सरपंच, उपसरपंच निवडणूक बिनविरोध केल्यानंतर ग्रामस्थांचे कौतुक करत विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात नवनिर्वाचित सरपंच ताईबाई पथवे, उपसरपंच नवनाथ आरोटे, सदस्य भाऊसाहेब पथवे, शालिनी आरोटे, नामदेव पथवे, सुजाता आरोटे, मंगल पथवे यांचा सत्कार आ. लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला. रवींद्र आरोटे, विजय आरोटे, निवृत्ती आरोटे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आ. लहामटे बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंत आरोटे होते. ज्ञानेश्वर नवले, पोलीस पाटील किसन आरोटे, प्रा. जे. डी. आरोटे, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष संपत आरोटे, दादाभाऊ आरोटे, कैलास आरोटे, शिवाजी आरोटे, बाळासाहेब आरोटे, मधुकर आरोटे, सुनील मोहटे, तंटामुक्ती अध्यक्ष किसन आरोटे, नामदेव आरोटे, शिवनाथ भागवत उपस्थित होते.
लहामटे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे व महादेव मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. लहामटे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि २६ लाख रुपयांचा निधी गाव विकासाठी मिळवा, असे आश्वासन दिले होते. यानुसार आपण चितळवेढे गावाच्या विकासासाठी २६ लाख रुपयांचा निधी देणार आहोत. यासाठी विकास कामांचा आराखडा तयार करा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन यशवंत आरोटे यांनी केले, तर आभार माजी सरपंच विश्वंभर आरोटे यांनी मानले.