संगमनेरात ५०० बेडचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:36+5:302021-04-19T04:18:36+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे रविवारी (दि. १८) संगमनेरात आले होते. अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत आयोजित कोरोना आढावा ...

संगमनेरात ५०० बेडचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे रविवारी (दि. १८) संगमनेरात आले होते. अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत आयोजित कोरोना आढावा बैठकीत त्यांनी थोरात सहकारी साखर कारखानाला प्रशासनाला तातडीने कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचोरीया, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे मुख्याधिकारी अनिल शिंदे, यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे आरोग्य अधिकारी महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना महसूलमंत्री थोरात यांनी प्रशासनाला केल्या. राज्यात ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेल्या निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहनदेखील थोरात यांनी केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे यांसह सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तातडीने विघ्नहर्ता पॅलेस येथे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता गृहविलगीकरणाची सोय पूर्णपणे बंद करण्यात आली असून रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे.