शेततलावात बुडून चुलत भाऊ, बहिणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:07 IST2020-07-10T18:02:52+5:302020-07-10T18:07:33+5:30
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील पठार वस्तीवर गुरे चारताना वस्तीजवळील शेततळ्यात बुडून चुलत भाऊ, बहिणीचा मृत्यु झाला.

शेततलावात बुडून चुलत भाऊ, बहिणीचा मृत्यू
चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील पठार वस्तीवर गुरे चारताना वस्तीजवळील शेततळ्यात बुडून चुलत भाऊ, बहिणीचा मृत्यु झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१० जुलै) दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.
तुषार राजेंद्र पवार (वय १२) व संस्कृती संदीप पवार (वय ७) अशी मृत पावलेल्या भाऊ, बहिणीचे नाव आहे.
दोघाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र रघुनाथ पवार यांचा मुलगा व त्यांचे बंधू संदीप रघुनाथ पवार यांची मुलगी आहे. या घटनेने चिचोंडी पाटील परिसरात शोककळा पसरली आहे.