भिंगारमध्ये दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:24 IST2019-11-29T15:23:56+5:302019-11-29T15:24:16+5:30
पती-पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

भिंगारमध्ये दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
भिंगार(अहमदनगर) : पती-पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना भिंगार येथे बुºहानगर रोडवरील लष्करी हद्दीत असलेल्या एका शेतातील विहिरीत घडली.
बादल हरिश्चंद्र वाल्मिकी (वय २६), बबली बादल वाल्मिकी (वय १९) असे या जोडप्याचे नाव आहे. हे जोडपे भिंगार परिसरातील इंद्रानगर येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सकाळी विहिरीतून कसला तरी वास येतो म्हणून तेथील सुरक्षा रक्षकाने विहिरीत डोकावून पाहिले. तर त्यास विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. या सुरक्षा रक्षकाने तातडीने या घटनेची माहिती भिंगार पोलिसांना दिली. हे दांम्पत्य रविवारी रात्रीपासून गायब होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. भिंगार पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, दाम्पत्यांने आत्महत्या केली? हे मात्र अद्याप समजू शकली नाही. पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.