मनपाचा २७ कामांच्या निविदांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:45+5:302021-01-15T04:18:45+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या कामांसाठी ठेकेदारांकडून दाखल करण्यात आलेल्या निविदा छाणननी समितीने नामंजूर केल्या असून, विविध कामांच्या २७ निविदांची प्रक्रिया ...

मनपाचा २७ कामांच्या निविदांना ब्रेक
अहमदनगर : महापालिकेच्या कामांसाठी ठेकेदारांकडून दाखल करण्यात आलेल्या निविदा छाणननी समितीने नामंजूर केल्या असून, विविध कामांच्या २७ निविदांची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कामगारांच्या भविष्य निर्वाहनिधीची रक्कम न भरल्याने निविदांना स्थगिती दिल्याची हि पहिलीच घटना आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागात शासकीय योजनांसह अंदाजपत्रकातील विविध २७ कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ठेकेदार संस्थांनी निविदा दाखल केल्या. या निविदांची छाणनी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून नुकतीच करण्यात आली. छाणननी दरम्यान ठेकेदारांनी त्यांच्याकडे असलेल्या कामगारांचा भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कार्यालयात भरला नसल्याचे निदर्शनास आले. ठेकेदार संस्थांनी कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी नियमित भरावा, असा नियम आहे. त्यानुसार कामगारांचा भविष्यनिर्वाहनिधी भरल्याची माहिती निविदेसोबत जोडणे आपेक्षित आहे. यापूर्वी महापालिकेला भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरावी लागली. त्यामुळे ठेकेदार संस्थांकडून ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात न भरल्यास त्याचा भुर्दंड पालिकेला बसतो. ही बाब लक्षात घेऊन छाणनी समितीने हा निर्णय घेतला असून, सन २०१६-१७ मध्ये किती कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी भरला, याविषयीचा अहवाल सादर करण्याचा आदेश ठेकेदारांना देण्यात आला आहे.
...
- विविध विकास कामांसाठीच्या निविदा स्थगिती देण्यात आली आहे. कामगारांच्या भविष्यनिर्वाहनिधीबाबत शासनाचा आदेश आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून, ही रक्कम भरल्याचा अहवाल मागविण्यात आला आहे. ठेकेदारांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यरंभ आदेश देण्यात येतील.
-डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त, मनपा