आढळगाव परिसरात २२ गावात पोहोचली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:58+5:302021-06-24T04:15:58+5:30

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील २२ गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पोहोचली असून ५ हजारांहून अधिक ...

Corona vaccine reached 22 villages in Adhalgaon area | आढळगाव परिसरात २२ गावात पोहोचली कोरोना लस

आढळगाव परिसरात २२ गावात पोहोचली कोरोना लस

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील २२ गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पोहोचली असून ५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये बाधितांची आकडेवारी वाढली. तसेच मृत्यूही वाढल्यामुळे कोविड प्रतिबंधक लसींची मागणी वाढली. लसीकरण कार्यक्रमात स्थानिक राजकीय हस्तक्षेपाने आरोग्य विभाग हतबल झाला होता. आढळगावात लसीकरणासाठी कार्यक्षेत्रातील नागरिकांची गर्दी होत होती. गर्दीचा फायदा घेऊन राजकीय पदाधिकारी कुटुंबीयांसह नातेवाइकांचेही लसीकरण करून घेण्याचा आटापिटा करत होती. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीकांत शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर आणि जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांचे मार्गदर्शन घेऊन कार्यक्षेत्रातील सर्वच २२ गावांमध्ये लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन केले. एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यास या नियोजनामुळे यश आले. आरोग्य सेवक कर्मचारी तसेच आशा सेविकांचे सहकार्य घेऊन २२ गावांमध्ये लसीकरण कार्यक्रम राबविला. लसीकरणासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचाही सहभाग घेऊन पाच हजारांच्यावर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले.

----

कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा मर्यादित होत असताना कार्यक्षेत्रातील २२ गावांमध्ये लसीकरण कार्यक्रम राबविला. आता १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरण करण्याच्या सूचना आल्या आहेत. ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याचे नियोजन आहे.

-श्रीकांत शेळके,

वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आढळगाव

Web Title: Corona vaccine reached 22 villages in Adhalgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.