सारोळा कासार येथे कोरोना लसीकरण कँप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST2021-04-07T04:22:15+5:302021-04-07T04:22:15+5:30
सारोळा कासार येथील आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी लोकवर्गणी काढत सामाजिक भावनेतून चास आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोफत ...

सारोळा कासार येथे कोरोना लसीकरण कँप
सारोळा कासार येथील आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी लोकवर्गणी काढत सामाजिक भावनेतून चास आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोफत वाहन व्यवस्था केली होती. या उपक्रमात गावातील १५० नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी गावातच उपकेंद्र स्तरावर कँपचे आयोजन करण्याची मागणी उपसरपंच जयप्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांच्याकडे केली होती. ती मान्य करीत त्यांनी ११८ लसीचे डोस उपलब्ध करून दिले. त्यानुसार मंगळवारी (दि.६) हा कँप पार पडला.
संजय धामणे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, संजय काळे, गोराभाऊ काळे, योगिराज धामणे, पवन कडूस, शहाजान तांबोळी, सचिन कडूस, राजेंद्र कडूस, बाळासाहेब कडूस, सुभाष धामणे यांनी मदत केली.
चास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सारोळा कासार आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुविधा धामणे, आरोग्यसेविका इंदुमती गोडसे, डॉ. राहुल धामणे, वर्षा धामणे यांनी परिश्रम घेतले.