जामखेडमध्ये तिघांंना कोरोनाची लागण; जिल्ह्याचा आकडा पोहोचला आठवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 15:07 IST2020-03-31T15:06:48+5:302020-03-31T15:07:31+5:30
दोन दिवसांपूर्वी परदेशी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले जामखेड येथील तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे लोन आता नगर शहराबाहेरही पसरले असल्याचे दिसते आहे.

जामखेडमध्ये तिघांंना कोरोनाची लागण; जिल्ह्याचा आकडा पोहोचला आठवर
अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी परदेशी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले जामखेड येथील तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे लोन आता नगर शहराबाहेरही पसरले असल्याचे दिसते आहे.
१४ मार्च रोजी १४ परदेशी पाहुणे नगर जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यातील एक फ्रान्स व दुसरा आयव्हरी येथील होता. या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित बारा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु या परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. परदेशी लोक संगमनेर, जामखेड, राहुरी, नेवासा, नगर शहरातील मुकुंदनगर भागातही राहून गेले आहेत. त्यामुळे येथील अनेक जण त्यांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाने या सर्वांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात बोलावले होते. त्यापैकीच जामखेड येथील तीन जणांना कोरणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (३१ मार्च) त्यांचा अहवाल पुणे येथील लॅबकडून मिळाला. आता या पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरनाबाधित यांची संख्या आठवर पोहोचली आहे. त्यातील एकाला तीन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला आहे.