शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

१५ जूननंतर कुकडीचा निर्णय

By admin | Updated: May 31, 2014 00:24 IST

श्रीगोंदा : धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा नसताना घोडचे आवर्तन सोडण्यास भाग पाडण्यात आले. येत्या १५ जूननंतर कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय अपेक्षित आहे,

श्रीगोंदा : धरणांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा नसताना घोडचे आवर्तन सोडण्यास भाग पाडण्यात आले. येत्या १५ जूननंतर कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी पत्रकारांशी बोलतान्ाां दिली. ते म्हणाले, कुकडी प्रकल्प आठमाही आहे. यातून तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार तीन आवर्तने सोडली. सध्या कुकडी प्रकल्पात २.७ टीएमसी पाणीसाठा आहे. प्रकल्पातील साडेपाच टीएमसीचे बाष्पीभवन झाले तर सव्वाचार टीएमसी पाणी वाया गेले आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्यात येऊन फळबागा जगविल्या. कुकडीचे पाणी जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या अहवालानुसार १५ जूननंतर कुकडीचे आवर्तन सुटू शकते. श्रीगोंदा नगरपालिका व काष्टी ग्रामपंचायतीने यापुढे ५० दिवस पाणी लागणार नाही असे लेखी दिल्याने घोडचे आवर्तन सोडण्यात आले. बंधार्‍यातील पाणी मिळाले तर घोडचे आवर्तन पूर्ण क्षमतेने होऊ शकते, असे पाचपुते म्हणाले. एक जूननंतर श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव, लिंपणगाव वीज उपकेंद्राचे काम सुरु होणार आहे. जून महिन्यात उर्वरित पाच उपकेंद्रांची कामे सुरु होणार आहेत. हिंगणी, मढवडगाव, मांडवगण उपकेंद्राची क्षमता दुप्पट करण्यात येणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी) विरोधकांना टोला ‘घोड‘, ‘कुकडी’ च्या आवर्तनासाठी मुंबईत तीन दिवस तळ ठोकला. अधिकार्‍यांना बैठकीत तासभर उभे केले. त्यामुळे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. रस्त्यावर बसून अगर आंदोलन करुन पाणी सुटत नाही, असा टोला बबनराव पाचपुते यांनी विरोधकांना मारला.