कोविड सेंटरमधील रुग्णांच्या जिभेला कंत्राटी चव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:41+5:302021-05-04T04:09:41+5:30
कोविड सेंटरमधील रुग्णांच्या जिभेला कंत्राटदाराकडून रुचकर जेवणाची चव पाकिटातून आहार : शंभर रुपयांत चहा, नाश्ता व जेवण शिवाजी पवार ...

कोविड सेंटरमधील रुग्णांच्या जिभेला कंत्राटी चव
कोविड सेंटरमधील रुग्णांच्या जिभेला
कंत्राटदाराकडून रुचकर जेवणाची चव
पाकिटातून आहार : शंभर रुपयांत चहा, नाश्ता व जेवण
शिवाजी पवार
श्रीरामपूर : कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना चहा, नाश्ता व दोन वेळचे रुचकर जेवण कंत्राटदाराकडून दिले जात आहे. या सर्व खर्चापोटी कंत्राटदाराला एका रुग्णामागे अवघे शंभर रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यातूनच रुग्णाच्या जिभेला चव आणण्याचे काम कंत्राटदार करत आहेत.
राज्य सरकारने निश्चित राज्यभरात निश्चित केलेल्या दरांतच रुग्णांना आहार मिळत आहे. एका रुग्णाच्या दिवसभराच्या चहा, नाश्ता व जेवणापोटी कंत्राटदाराला शंभर रुपये दर देण्यात आला आहे. नाश्त्यामध्ये वैविध्य ठेवावे, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. जेवणामध्ये चांगल्या गव्हाच्या चपात्या अपेक्षित आहेत. भाजी दररोज बदलून द्यावी लागते. एकाच प्रकारची भाजी सलग दोन दिवस देता येत नाही. प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधींचे या कामाकडे बारीक लक्ष असते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड रोखली जात असून, कंत्राटदारांना बिले अदा करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
-----
काय दिली जाते जेवणात
सकाळी नाश्त्याला पोहे व उपमा आलटून पालटून दिला जातो. जेवणामध्ये पोळी व भाजी असा आहार आहे. भाज्यांमध्ये सोयाबीन, मटकी, बटाटा या बरोबरच मेथीही दिली जाते. पाकिटामध्ये पॅकिंग स्वरूपात खाद्य पुरविले जाते. त्यामुळे एका वेळच्या जेवणासाठी पाच रुपये पाकिटावर खर्च होतो. नाश्त्याला २० रुपये, तर जेवणासाठी चाळीस रुपये दर ठरवून देण्यात आला आहे.
-----
कोविड केअर सेंटर रुग्णांनी फुल्ल
जिल्ह्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील कोविड केअर सेंटर सौम्य लक्षणांच्या रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. शंभर ते दोनशे रुग्ण प्रत्येक तालुक्यात सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
......................
कोविड सेंटरची संख्या : ०००
कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्ण : ००००
-----
टेबलवर जेवणाची पाकिटे ठेवून एका ठिकाणी उभे राहून नाश्ता व जेवण वितरित करण्याचे आदेश आहेत. मात्र, जागेअभावी तसे करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष सेंटरमध्ये जाऊन जेवण पुरवतो.
- अंबादास पवार, कंत्राटदार, श्रीरामपूर
-----
मी पाच दिवस श्रीरामपूर येथील कोविड सेंटरमध्ये भरती होतो. या काळात प्रत्येक वेळी नवीन भाजी मिळाली. कंत्राटदार स्वतः आल्यानंतर आपुलकीने प्रत्येकाला विचारत असे. जेवणालाही चांगली चव होती. रुग्णांना जेवणात काहीही कमी पडू दिले नाही.
-प्रसाद लढ्ढा, कोविड रुग्ण.
---
कोरोना रुग्ण हे कुटुंबीयांपासून दुरावलेले असतात. त्यामुळे त्यांच्या जेवणाबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये, अशा स्पष्ट सूचना कंत्राटदारांना दिल्या आहेत.
-अनिल पवार, प्रांताधिकारी, श्रीरामपूर.