प्रहारच्या निवेदनाची बांधकाम विभागाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:20+5:302021-02-06T04:36:20+5:30
वरूर : शेवगाव-पैठण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला २५ जानेवारीला दिले होते. तत्काळ ...

प्रहारच्या निवेदनाची बांधकाम विभागाने घेतली दखल
वरूर : शेवगाव-पैठण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला २५ जानेवारीला दिले होते. तत्काळ खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला होता. या निवेदनाची बांधकाम बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेत खड्डे बुजविण्यास सुरुवात केली.
प्रहारचे शेवगाव तालुकाध्यक्ष संजय नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली कल्पेश दळे यांनी व कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलनाचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. अतिवृष्टीमुळे रस्त्यावरील काही खड्डे दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहेत. त्या परिसरातील रस्त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक असून यासाठी वरिष्ठ कार्यालयास प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळताच ही कामेही केली जातील, असे सहाय्यक अभियंता अ. पालवे यांनी सांगितले. निवेदनावर शंकरराव नेमाने, उमेश्वर मोरे, बाळासाहेब गालफाडे, गणेश पातकळ, गणेश थोरात, तात्यासाहेब थोरात, बाळू वीर, खानापूर ग्रा. पं. सदस्य रामभाऊ गोरे, दीपक दळे, संतोष थोरात आदी उपस्थित होते.