जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे संवर्धन आवश्यक
By | Updated: December 9, 2020 04:16 IST2020-12-09T04:16:12+5:302020-12-09T04:16:12+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात जागतिक मृदादिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वातावरण बदलानुसार मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात ...

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे संवर्धन आवश्यक
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात जागतिक मृदादिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वातावरण बदलानुसार मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एस. मोरे, समन्वयक डॉ. जयश्री कडू आदी उपस्थित होते.
कंकाळ म्हणाले, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, आवश्यक अन्नद्रव्ये, जिवाणूंचे प्रमाण, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण व जमिनीचा सामुवर मातीची सुपीकता अवलंबून असते. हवामानाच्या जास्त आणि कमी अशा पावसाच्या दोनही बाबींचा जमिनीच्या आरोग्यावर निरनिराळा प्रभाव असतो. कमी पाऊस आणि आवर्षण यामुळे सेंद्रीय कर्बाचे विघटन होऊन त्याचा -हास होतो. जास्त पावसाच्या परिस्थितीत हा सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो. जमिनीतील कर्बाच्या ऱ्हासामुळे सुपीकतेचे मोठे नुकसान होते. अवर्षण आणि तापमानाचा आणखी गंभीर परिणाम जमिनीतील क्षारांच्या प्रमाणावर होतो. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जास्त महत्त्वाच्या ठरतात. पिके आणि पीकपद्धती, उतारास आडवी पेरणे, जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी केलेल्या उपाययोजना, शेताची बांधबंदिस्ती, आच्छादनाचा वापर, जमीन झाकून टाकणारी पिके, धूप प्रतिबंधक पिके यासारख्या व्यवस्थापनाचा फायदा होतो.
प्रास्ताविक प्रा. आशुतोष वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जयश्री कडू यांनी केले. प्रा. गुंजाळ पूनम यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केेले, तर प्रा. अश्विनी तांबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर सहकारी यांनी परिश्रम घेतले.