शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढला : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:23 IST

गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

अहमदनगर : गुजरात राज्य विधानसभा निवडणुकीतकाँग्रेसला ८० जागांवर मिळालेला विजय मोठी लक्षणीय बाब आहे. हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाचा गुजरातमध्ये जनाधार वाढल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.गुजरात प्रदेश काँग्रेसच्या उमेदवार निवड व छाननी समितीच्या अध्यक्षपदी थोरात यांची तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नियुक्ती केली होती. गुजरातमधील काँग्रेस उमेदवार निवडीत व प्रचारात थोरात यांची महत्त्वाची भूमिका होती. या पार्श्वभूमीवर थोरातांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने कायम सर्वधर्म समभावाचा विचार जोपासला. गोरगरिबांना केंद्रबिंदू मानून सातत्याने विकासकामे केली आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास दाखविला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये ५७ जागांवरून ८० जागांवर मिळालेला विजय ही मोठी लक्षणीय बाब आहे. इतर ठिकाणीदेखील काँग्रेसच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली आहे. हुकूमशाही विचारसरणी असलेल्या भाजपच्या गुजरातमधील जागा घटल्या आहेत. यापुढे सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष दमदार वाटचाल करीत यश मिळवेल. गुजरातमधील भाजपचा विजय हा दबाव व धनशक्तीचा असून, काँग्रेसचा जनाधार वाढला आहे, असे थोरात म्हणाले.देशात मोदींची लोकप्रियता घसरत असून, भाजप व मोदींचा विकासकामांवर विश्वास नाही. त्यामुळे धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून राम मंदिरासारखा संवेदनशील विषय निवडणूक काळात बाहेर काढला. काँग्रेसविरुद्ध दर्जाहिन अपप्रचार केला. मात्र मोदी-शहांच्या भूमीत ८० जागांवर मिळविलेला नेत्रदीपक विजय हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेला मोठा विश्वास असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस