शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने पाठवल्या पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभा निर्गुडे, विक्रम नवले, ...

आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभा निर्गुडे, विक्रम नवले, अमोल नाईकवाडी, वनिता शेटे यांच्या नेतृत्वाखालील रॅली काढण्यात आली होती.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, नोटाबंदीच्या वेळीच देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. आता इंधन दरवाढीने सामान्य जनता मेटाकुटीस आली असून हुकुमशहा मोदी सरकारने दरवाढीला आळा घालावा. नवे तीन शेतकरीविरोधी काळे कायदे अंमलात आणू नयेत. राफेलचे पाप उघड होताच मोदी सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर येईल. मोदी सरकार पदोपदी शेतकरी व सामान्य जनतेला अवमानित करत आहे. धर्म-जात, बुध्दिभेद करून सत्तेत आलेल्या सरकारचा राफेल घोटाळा लवकरच बाहेर येईल. भाजप सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी युवकांना गावोगावी, घराघरात जाऊन जनजागृती करावी. भांडवलदारधार्जिणे भाजप सरकार असून ते शेतकरीविरोधी तीन कायदे आणून शेतकरी उद्ध्वस्त करू पाहात आहे. शेतमालकास शेतमजूर करून येथील शेती अदानी-अंबानीच्या घशात घालायचा भाजप सरकारचा डाव असून हे काळे कायदे रद्द न केल्यास भाजपला सामान्य शेतकरी कधीच माफ करणार नाही.

केंद्र सरकारने इंधन दरवाढीला आळा घातला नाही तर झेंडा बाजूला करून दांडे हातात घेऊन अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी दिला.

उत्कर्षा रूपवते यांनी मोदी सरकारला महिला काँग्रेसच्या वतीने गोवऱ्या भेट पाठवल्या असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, मीनानाथ पांडे, वकील भाऊसाहेब नवले, शिवाजी नेहे, बाळासाहेब नाईकवाडी, आरिफ तांबोळी, रमेश जगताप, उमेद शेख, अनिल वैद्य, मंदाबाई नवले, संगीता सापीके, जया झोळेकर, राधिका नवले, स्वाती नवले, सुजीत नवले, साईनाथ नवले, संपत कानवडे, दामोधर सहाणे, शंकरराव वाळुंज, पाटीलबुवा सावंत, ज्ञानेश्वर झडे, चंद्रमोहन निर्गुडे, भास्कर दराडे, शिवाजी आरोटे, भास्कर मंडलिक, रामदास धुमाळ आदी उपस्थित होते.

फोटो - १४ अकोले बैलगाडी रॅली, १४ अकोले गोवऱ्या