श्रीरामपुरात काँग्रेसची निदर्शने; चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:02 IST2020-06-26T18:01:35+5:302020-06-26T18:02:58+5:30

काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२६ जून) आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्यासमोर चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

Congress protests in Shrirampur; Wahili pays tribute to the soldiers who were martyred in the Chinese attack | श्रीरामपुरात काँग्रेसची निदर्शने; चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना वाहिली श्रद्धांजली

श्रीरामपुरात काँग्रेसची निदर्शने; चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना वाहिली श्रद्धांजली

श्रीरामपूर : काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२६ जून) आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्यासमोर चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी सभापती सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. मात्र असे असताना देशात पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या कारभाराचा यावेळी काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतला.

Web Title: Congress protests in Shrirampur; Wahili pays tribute to the soldiers who were martyred in the Chinese attack