अहमदनगर महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:41+5:302021-09-08T04:26:41+5:30
यामध्ये शिवम खंडेलवाल यास ८८.४० गुण, निखिल गायकवाड यास ८७.४५ गुण, तुषार आंधळे यास ८१.६६ गुण मिळाले. त्याबद्दल अहमदनगर ...

अहमदनगर महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थांचा सत्कार
यामध्ये शिवम खंडेलवाल यास ८८.४० गुण, निखिल गायकवाड यास ८७.४५ गुण, तुषार आंधळे यास ८१.६६ गुण मिळाले. त्याबद्दल अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉम्प्युटर सायन्सचे डॉ.सय्यद रज्जाक, उपप्राचार्य डॉ.ए.व्ही. नागवडे, उपप्राचार्य डॉ.बी.एम. गायकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ.प्रीतम कुमार बेदरकर आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य बार्नबस म्हणाले की, विद्यार्थ्यांचा उच्च दर्जाचे शिक्षण दिल्यानेच आज अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. डाॅ.रजाक, शिवम खंडेलवाल, निखिल गायकवाड, तुषार आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले.
-------
फोटो - ०७ नगर काॅलेज
अहमदनगर महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आला.