अभिनेत्री रविना टंडनसह फराह खान, भारती सिंग विरोधात नगरमध्ये तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 21:39 IST2019-12-28T21:35:06+5:302019-12-28T21:39:02+5:30
‘बँक बेचर्स’ या कार्यक्रमात अभिनेत्री फराह खान, भारती सिंग व रविना टंडन यांनी बायबलमधील ‘हलेलुया’ या पवित्र शब्दावर अश्लील भाष्य करत थट्टा केली आहे.

अभिनेत्री रविना टंडनसह फराह खान, भारती सिंग विरोधात नगरमध्ये तक्रार
अहमदनगर : टीव्ही शोमध्ये ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखविल्याप्रकरणी अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग व फराह खान यांच्याविरोधात ख्रिश्चन सेवा संघाच्यावतीने तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २८) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत संघाचे शहर जिल्हाध्यक्ष जेम्स आल्हाट, जॉन गायकवाड, रोहिदास मिरपगार, अमृतराव शिंदे, भालचंद्र भाकरे, अॅड. अडसूळ, छगनराव क्षेत्रे, एल.एम,पवार, जॉर्ज क्षेत्रे, प्रकाश क्षेत्रे, मनोज प्रभुणे, तुकाराम गायकवाड यांनी तोफखाना ठाण्याचे निरीक्षक एच.पी मुलानी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, ‘बँक बेचर्स’ या कार्यक्रमात अभिनेत्री फराह खान, भारती सिंग व रविना टंडन यांनी बायबलमधील ‘हलेलुया’ या पवित्र शब्दावर अश्लील भाष्य करत थट्टा केली आहे. यामुळे नाताळ सणाच्यानिमित्ताने देशभरातील ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.