अंधश्रद्धा निर्मूलन समितीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:18 IST2020-12-25T04:18:03+5:302020-12-25T04:18:03+5:30

अहमदनगर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली गत आठवड्यात पार पडली. ...

Committee for the Elimination of Superstition | अंधश्रद्धा निर्मूलन समितीची

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची

अहमदनगर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली गत आठवड्यात पार पडली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग संपर्कप्रमुख मिलिंद बागवे, मराठवाडा विभागप्रमुख किशोर वाघ उपस्थित होते. याप्रसंगी मिलिंद बागवे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. सुरेश झुरमुरे यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका व उद्दिष्टे समजावून सांगितली. किशोर वाघ यांनी कार्यकारिणी सदस्यांची जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व सदस्यांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती अशी- भगवान जगताप (जिल्हा संघटक), विशाल आठवले (जिल्हा युवा संघटक), डॉ. यशवंत पाटील (जिल्हाध्यक्ष), गोरख आळेकर (जिल्हा कार्याध्यक्ष), बाबासाहेब शेलार (जिल्हा उपाध्यक्ष), गणेश सांगळे ( जिल्हा सचिव), सुदेश गायकवाड (जिल्हा कोषाध्यक्ष), संगीता मालकर (जिल्हा महिला अध्यक्षा), रघुनाथ गायकवाड (जिल्हा प्रसिद्धीप्रमुख), सदस्य म्हणून सुनील जगधने, सतीश मुंतोडे, अविनाश कुटे, नागेश शिंदे, गणेश केंदळे, प्रवीण बळीद, राजू काळे, योगेश महाले, नारायण डुकरे, दीपक पारखे, डॉ. जगदीश राठोड, संजय वारभोर यांची निवड करण्यात आली. सर्व तालुक्यांसाठी तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Web Title: Committee for the Elimination of Superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.