नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:10+5:302021-07-17T04:18:10+5:30

नेवासा : मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत, अशी ग्वाही पंचायत समितीच्या ...

Committed to the overall development of Nevasa taluka | नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

नेवासा : मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे नेवासा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत, अशी ग्वाही पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी दिली.

तालुक्यातील मांडेगव्हाण, मोरगव्हाण या गावांमध्ये मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जिल्हा परिषद सदस्या सविता अडसुरे यांच्या निधीतून मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मांडेगव्हाण येथील शिंदे वस्ती रस्ता खडीकरण, मांडेगव्हाण गावात प्राथमिक शाळा खोली बांधकाम करणे, मोरगव्हाण येथे नवीन कूपनलिका घेणे, इलेक्ट्रिक मोटर बसविणे, मोरगव्हाण येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम आदी ५० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे हे तालुक्यातील पहिलेच काम आहे. हे काम मंत्री गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाले.

यावेळी पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, पं. स. सदस्य बाळासाहेब सोनवणे, अनिल अडसुरे, कारभारी जावळे, सरपंच अमोल जाधव, बाबूराव चौधरी, प्रकाश भालके, सरपंच धनंजय वाघ, संदीप येळवंडे, अरुण सोनकर, भानुदास सोनवणे, आप्पासाहेब शिंदे, बबनराव बाराहाते, सरपंच लक्ष्मण घुले, बलभीम काळे, मारुती जगदाळे, एकनाथ जाधव, बाबासाहेब सोनवणे, अजिनाथ जगदाळे, सर्जेराव धंदक, भीमराव सोनवणे, देविदास उदमले, पाटीलबा जाधव, लक्ष्मण गाढे, सूर्यभान बर्डे, ज्ञानदेव धंदक, सरपंच अंबादास आव्हाड, पोपट माळी, भारत पालवे, महादेव पालवे आदी उपस्थित होते.

-----

१६ नेवासा गडाख

मांडेगव्हाण, मोरगव्हाण येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना माजी सभापती सुनीता गडाख.

Web Title: Committed to the overall development of Nevasa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.