यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भाऊसाहेब डोळस, मुक्तार शहा, ताराचंद रणदिवे, दीपक चव्हाण, रवी पाटील, कलीम कुरेशी, दीपक चरण चव्हाण, अल्तमश पटेल, रोहित शिंदे, रईस जहागीरदार, नगरसेविका वैशाली चव्हाण, जयंत चौधरी उपस्थित होते.
पालिकेच्या वतीने शहरांत मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. शहरातील मिनी स्टेडियमच्या अपूर्ण राहिलेल्या कामाला निधी मिळवून द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली.
राज्यात कोरोनामुळे जवळपास एक ते दीड वर्ष वाया गेले. यामुळे सर्वच यंत्रणा ठप्प झाली आहे. आता काही प्रमाणात निर्बंध कमी झाले असले तरी तिसरी लाट येण्याचा धोका आहे. या सर्व बाबीचा विचार करता सरकारकडे निधीची कमतरता आहे. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरासाठी निधी देण्याचा शब्द दिला आहे, असे आदिक यांनी सांगितले. क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत मिनी स्टेडियमसाठी निधीची मागणी केली. त्यावर मंत्री केदार यांनी तात्काळ निधी देण्याचे मान्य केले.
----------