शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

चुग यांना उपनगराध्यक्षपदाची संधी?

By admin | Updated: September 7, 2016 00:37 IST

श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली

श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार महिन्यांसाठी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदाची खांदेपालट केली जाणार असून रणजितसिंग प्रेमसिंग आहुजा ऊर्फ राजन चुग यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली जाण्याची शक्यता कॉँग्रेसच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे. डिसेंबरमध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपद यावेळी जनतेतून निवडले जाणार आहे. बिहाणी यांनी दोन विधानसभा व नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे व भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्या बालेकिल्यातून बिहाणी यांनी विजयश्री मिळवत कांबळे-चित्ते यांचा पराभव केला होता. उपनगराध्यक्षपदासाठी शामलिंग शिंदे, राजश्री सोनवणे, दिलीप नागरे, कैलास दुबैय्या यांची नावे चर्चेत असली तरी राजन चुग यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. चुग हे ससाणे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे चुग यांच्याच गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ टाकली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यमान नगरसेवक रवींद्र गुलाटी व राजेश अलग हे राजकीय मतभेदामुळे ससाणे यांच्यापासून दुरावले गेले आहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय गणिते जुळविण्यात पटाईत असलेले नगरपालिकेचे सर्वेसर्वा जयंत ससाणे यांनी राजन चुग यांना संधी देऊन पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचे मानले जाते. राजन चुग यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देऊन ससाणे यांनी आगामी राजकीय बुद्धीबळाच्या पटलावर विरोधकांना ‘चेकमेट’ देण्याचा प्रयत्न केला आहे.