छिंदम याचे कार्यालय जाळपोळप्रकरणी चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 13:03 IST2018-02-19T13:01:49+5:302018-02-19T13:03:24+5:30
भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या बंटी राऊत याच्यासह अनोळखी चौघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉस्टेबल बिलाल शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे.

छिंदम याचे कार्यालय जाळपोळप्रकरणी चौघांवर गुन्हा
अहमदनगर : भाजपाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या बंटी राऊत याच्यासह अनोळखी चौघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉस्टेबल बिलाल शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे.
बंटी राऊत व त्याच्या तीन साथीदारांनी मोटारसायकलवर येऊन रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दिल्ली गेट येथे छिंदम याच्या कार्यालयाजवळ जळती बाटली फेकली. या बाटलीत पेट्रोल असल्याने कार्यालयाच्या शटरने पेट घेतला होता. यावेळी मात्र तातडीने ही आग विझविण्यात आली. याप्रकरणी रात्री ११ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
छिंदमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणा-या याच बंटी राऊतने रविवारी एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. या क्लिपमध्ये त्याने कार्यालयाज जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली देत इतरही काही वादग्रस्त विधाने केले आहेत.