छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:23 IST2021-08-15T04:23:22+5:302021-08-15T04:23:22+5:30
सामाजिक बांधिलकी म्हणून संघटनेमधील सभासदांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राबाहेरील तसेच विदेशातील ग्रुपच्या ...

छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
सामाजिक बांधिलकी म्हणून संघटनेमधील सभासदांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राबाहेरील तसेच विदेशातील ग्रुपच्या सभासदांनी भरीव मदत पाठवली. ग्रुपचे सदस्य मदत घेऊन पूरग्रस्त भागात दाखल झाले व गरजूंपर्यंत त्यांनी मदत पोहोचवली. अनेक परिवारास महिनाभर पुरेल अशा पद्धतीने जीवनावश्यक अन्नधान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. भूस्खलन झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निवगंण, गुढे, कुढली खुर्द या गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले होते. या ग्रुपने गावांत जाऊन मदत सुपुर्द केली. या कार्यात अहमदनगर अॅडमिन टीमचे संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, भाग्येश सव्वाशे, संजय शिंदे, प्रमोद काकडे, अशोक गाडे, युवराज काटे, अजिनाथ मोकाटे, वसंत आभाळे, महेश पवार, अक्षय साबळे, अतुल चौधरी, राहुल साबळे, विनायक करवंदे, अक्षय साबळे, अमोल साबळे, शांताराम साबळे, गोकुळ साबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
-----------------------------------
फोटो १४ मदत
ओळी-कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्याने या पूरग्रस्तांसाठी छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंसह किराणा किट व इतर साहित्याची मदत देण्यात दिली.