रासायनिक खतांच्या किमती सहाशे रुपयांनी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:14+5:302021-05-17T04:19:14+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे शेतीमालाचे भाव पडले असतानाच रासायनिक खतांच्या किमती सहाशे रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे बळीराजाचे खरीप हंगामाचे आर्थिक ...

रासायनिक खतांच्या किमती सहाशे रुपयांनी वाढल्या
अहमदनगर : कोरोनामुळे शेतीमालाचे भाव पडले असतानाच रासायनिक खतांच्या किमती सहाशे रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे बळीराजाचे खरीप हंगामाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे धान्य, कांदा, भाजीपाला आणि फळांचे भाव पडले आहेत. भाजीपाला व फळांची मागणीही घटली आहे. मागणी नसल्याने गुंतवणूक वसूल झालेली नाही. त्यामुळे आधीच बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांकडून खते व बियाण्यांची मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी रासायनिक खतांची मात्र दिली जाते. त्यामुळे या काळातच रासायनिक खतांची आवश्यकता भासते. पावसाळा तोंडावर आल्याने उसाच्या मशागतीची कामेही सुरू आहेत. ऊस पिकासाठी रासायनिक खातांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विविध कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी ५० ते १०० रुपयांची वाढ होत होती. मात्र, चालू वर्षी एकदम ६०० ते ७०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत.
रासायनिक खतांच्या इफको, आयपीएल, महाधन, सरदार आदी कंपन्यांनी वाढ केली असून, ही वाढ पावसाळ्याच्या तोंडावर झाल्याने बळीराजाचे खरिपाचे नियोजन कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात डिझेलच्याही किमती वाढल्याने मशागतीचा खर्च वाढला आहे. मशागतीबरोबरच आता रासायनिक खतांचे दरही वाढल्याने खरिपाची पिके घेणे शेतकऱ्यांसाठी अर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे.
...
असे वाढले दर
इफको
१०.२६.२६- १७७५
१२.३२.१६-१८००
२०.२०.०-१३५०
डीएपी-१९००
...
आयपीएल
डीएपी- १९००
२०.२०.०- १४००
पाेटॅश- १०००
....
महाधन
१०.२६.२६- १९२५
२४.२४.०- १९००
....
सरदार
१०.२६.२६- १७७५
१२.३२.१६- १८००
२०.२०.१३- १३५०
डीएपी-१९००
सुपर फाॅस्फेट-४७०
....
रासायनिक खतांचे दर मे महिन्यात वाढलेले आहेत. त्यापूर्वी खतांचे दर कमी हाेती. कृषी सेवा केंद्र चालकांनी जुन्या खतांची विक्री पूर्वीच्याच दराने विक्री करावी, नवीन दराने विक्री करू नये. जुन्या खतांची नवीन दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- सुनीलकुमार राठी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद
....