चेक नाके, भरारी पथकांचा अवैध वाळू, मुरुम वाहतुकीवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:07+5:302021-02-06T04:36:07+5:30
पारनेर : तालुक्यातील विविध नदीपात्रे तसेच आढे, नाले यातून अवैध मार्गाने वाळू, मुरुम तसेच तत्सम गौण खनिजाचे मोठ्या ...

चेक नाके, भरारी पथकांचा अवैध वाळू, मुरुम वाहतुकीवर ‘वॉच’
पारनेर : तालुक्यातील विविध नदीपात्रे तसेच आढे, नाले यातून अवैध मार्गाने वाळू, मुरुम तसेच तत्सम गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असून तशा तक्रारीही करण्यात येत आहेत. अनधिकृत वाळू उत्खनन तसेच वाहतूक रोखण्यासाठी तालुक्यातील चार ठिकाणी चेक नाके तयार करण्यात आले असून, दोन भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली असून, प्रत्येक चेक नाके तसेच भरारी पथकामध्ये महसूल कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २४ तास चेक नाके तसेच भरारी पथके अवैध गौण खनिजाचे उत्खनन तसेच वाहतुकीवर ‘वॉच’ ठेवणार आहेत.
ढोकी येथील टोलनाक्यावरील चेक पोस्टवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत टाकळी ढोकेश्वरचे मंडलाधिकारी पी. बी. जगदाळे, अळकुटीचे तलाठी दीपक गोरे, देविभोयरे येथील तलाठी विनोद जाधव, कर्जुले हर्या येथील तलाठी श्रीमती निकाळजे, कान्हूरच्या तलाठी व्ही. पी. कदम, कान्हूरपठारचे कोतवाल गरेख गायकवाड, पिंपळगाव रोठाचे कोतवाल बबन बोरुडे तर रात्री ८ ते सकाळी ८ यादरम्यान वडझिरेचे मंडलाधिकारी पी. एस. उचाळे, हंगेचे तलाठी ए. के. डोळस, टाकळी ढोकेश्वरचे तलाठी स्वप्निल गोरे, नारायणगव्हाणेचे तलाठी प्रकाश शिरसाठ, जवळेचे तलाठी साठे, सावरगावचे कोतवाल अशोक अल्हाट, टाकळी ढोकेश्वरचे कोतवाल अनिल कोठुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
म्हसणे फाटा येथील टोलनाक्यावरील चेकपोस्टवर सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान पारनेरचे मंडलाधिकारी सचिन पोटे, तलाठी ए. के. लांडे, तलाठी आर. डी. गोल्हार, वासुदेच्या तलाठी तराळ, ढवळपुरीचे तलाठी विराज वाघमारे, म्हसणेचे कोतवाल राजू तरटे, पळवे खुर्दचे कोतवाल मुनीर शेख तसेच रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान सुपे येथील मंडलाधिकारी शिवाजी शिंदे, वडझिरे येथील तलाठी ए. डी. घोडके, गोरेगावचे तलाठी येवले, पळवे खुर्दच्या तलाठी ए. आर. गावडे, कडूसचे तलाठी संतोष मांडगे, पानोलीचे कोतवाल रामदास साळवे, कडूसचे कोतवाल चंद्रकांत जाधव हे नियुक्तीवर असतील.
गव्हाणवाडी फाटा येथील चेकनाक्यावर सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान निघोजचे मंडलाधिकारी डी. पी. शेकटकर, वनकुटेचे तलाठी मच्छिंद्र उंडे, पानोलीच्या तलाठी स्वाती वायफळकर, चाेंंभूतचे तलाठी संतोष तनपुरे, पुणेवाडीच्या तलाठी एस. पी. खोचे, म्हसणेच्या तलाठी मोहिनी साळवे, हंगेचे कोतवाल मनोहर तटले तर रात्री ८ ते सकाळी ८ वाडेगव्हाणचे मंडलाधिकारी आर. आर. कोळी, लोणी मावळाचे तलाठी डी. आर. म्हेत्रे, जवळ्याचे तलाठी आकाश जोशी, जामगावच्या तलाठी संगीता मगर, निघोज तलाठी व्ही. वाय. निंबाळकर, रुईछत्रपतीचे तलाठी सतीश पवार, रांजणगाव मशीदचे रामदास साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मांडओहळ फाटा येथील चेकनाक्यावर सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान भाळवणीचे मंडलाधिकारी डी. डी. कदम, राळेगणथेरपाळचे तलाठी अमोल सरकाळे, चिंचोलीचे तलाठी आशीर्वाद घोरपडे, करंदीचे तलाठी बी. एम. मचलेकर, वाडेगव्हाणचे तलाठी किरण फातले, वडगावसावताळचे कोतवाल श्रीकांत आंबेकर, वडगावदर्याचे कोतवाल संतोष बोरुडे. रात्री ८ ते सकाळी ८ दरम्यान पळशीचे मंडलाधिकारी कुमार पवार, भाळवणीचे तलाठी शशिकांत मोरे, पळशीचे तलाठी राम शिरसाठ, वडगाव सावताळचे तलाठी नांगरे, सुप्याचे तलाठी बी. एम. कुसमुडे, काताळवेढेचे कोतवाल भाऊ गफले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
----
नायब तहसीलदार भरारी पथक प्रमुख..
ढोकी व म्हसणे फाटा येथील चेकनाक्याचे प्रमुख म्हणून नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, गव्हाणवाडी फाटा, मांडओहळ फाटा येथील चेकनाक्याचे प्रमुख म्हणून नायब तहसीलदार एम. ए. माळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.