पंधरा दिवसांत दाखल होणार दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:24+5:302021-02-15T04:19:24+5:30
बोठे याने सुपारी देऊन जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या घडवून आणली. या घटनेनंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे, आदित्य ...

पंधरा दिवसांत दाखल होणार दोषारोपपत्र
बोठे याने सुपारी देऊन जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या घडवून आणली. या घटनेनंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे, आदित्य सुधाकर चोळके, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे व फिरोज राजू शेख यांना अटक केली. हे पाच जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. घटनेनंतर नव्वद दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांच्या आत अटकेत असलेल्या पाच जणांविरोधात दोषाराेपपत्र दाखल केले जाणार आहे. बोठे याला अटक झाल्यानंतर त्यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपत्र दाखल होणार आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. दरम्यान, जरे यांच्या हत्याकांडाच्या घटनेला अडीच महिने लोटले तरी पोलिसांना अद्यापपर्यंत बोठे सापडलेला नाही.
.................
बोठेच्या मालमत्तेची चौकशी अंतिम टप्यात
बोठे सापडला नाही, तर पोलीस त्याची मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज करणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून बोठे याची नगर शहरासह जिल्ह्यात किती ठिकाणी मालमत्ता आहे. याची माहिती घेण्यातस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बोठे याच्या नगर शहरातील पंधरा मालमत्ता समोर आल्या आहेत. जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी त्याची मालमत्ता आहे याचीही पोलीस माहिती घेत आहेत.