श्री गणेश शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:32+5:302021-09-09T04:26:32+5:30
कोपरगाव : राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा ...

श्री गणेश शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन साजरा
कोपरगाव : राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध उद्योजक संदीप लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, उपाध्यक्षा कामिनी शेटे, विश्वस्त प्रा. भारत शेटे, संदीप चौधरी, रवींद्र चौधरी, किरण भारस्कर, प्राचार्य रियाज शेख, प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्राचार्या सुषमा डांगे, उपप्राचार्य प्रा. प्रवीण दहे, सुपरवायझर प्रवीण चाफेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापू पुणेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल शेटे, क्षितिजा भडके, रिद्धी लहारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. नंदलाल आहेर, प्रा. राजेंद्र निर्मळ, वसुंधरा बावके, सौरभ आसणे, साईप्रसाद घारे, साईशा पाटील, गायत्री गुंजाळ, पूजा चौधरी, वैष्णवी चौधरी, सार्थक गायकवाड, शर्विन चौरे यांनी प्रयत्न केले.