सोमैया महाविद्यालयात वृक्षारोपण करून वसुंधरा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:21 IST2021-04-23T04:21:41+5:302021-04-23T04:21:41+5:30

कोपरगाव : शहरातील के. जे. सोमैया महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या हस्ते वसुंधरा ...

Celebrate Earth Day by planting trees at Somaiya College | सोमैया महाविद्यालयात वृक्षारोपण करून वसुंधरा दिन साजरा

सोमैया महाविद्यालयात वृक्षारोपण करून वसुंधरा दिन साजरा

कोपरगाव : शहरातील के. जे. सोमैया महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या हस्ते वसुंधरा दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.

प्राचार्य यादव म्हणाले, आजच्या काळात आपल्या सर्वांनाच ऑक्सिजनचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आले आहे. पृथ्वी व मानव वाचवायची असेल तर आपण सर्वांनी वृक्षारोपण ही जन चळवळ करावी लागेल. यामध्ये समाजातील सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, भूगोल विभाग प्रमुख डॉ. गणेश चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालय ( चासनळीचे ) उपप्राचार्य बारे, कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे, बीबीए विभागाचे प्रमुख प्रशांत भदाने व राष्ट्रीय सेवा योजना अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक डॉ. शैलेंद्र बनसोडे उपस्थित होते.

Web Title: Celebrate Earth Day by planting trees at Somaiya College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.