शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जामखेड रस्त्यावर कार उलटली; शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2022 15:46 IST

कुटुंबातील तीन जण या अपघातात जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले.

अशोक निमोणकर 

जामखेड (जि. अहमदनगर)  - राजस्थान येथुन देवदर्शन करुन जामखेडकडे परतणाऱ्या जामखेड शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांचे चारचाकी वाहन नगर जामखेड रोडवरील आष्टी तालुक्यातील पोखरी जवळ आल्यानंतर कार पुलाच्या खाली गेल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या समवेत आसलेले कुटुंबातील तीन जण या अपघातात जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी आठ वाजता झाला.       याबाबत माहिती अशी की, जामखेड शहरातील प्रसिध्द व्यापारी म्हणून ओळख असलेले भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा (वय 58 वर्षे रा. जामखेड) हे काही दिवसांपुर्वीच आपल्या कुटुंबासमवेत राजस्थान या ठिकाणी देवदर्शनाला गेले होते. ते मंगळवारी रात्री विमानाने पुणे विमानतळ येथे आल्यानंतर मुलगी व जावई यांना पुणे येथे सोडून चारचाकी वाहनाने (क्र.एम. एच.16 ए. टी 8807) आपल्या कुटुंबासमवेत पुण्याहून पहाटे जामखेडकडे निघाले होते. त्यांची गाडी बुधवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर -जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आली होती. त्यानंतर तेथे असलेल्या पुलावरून अचानक सदर चारचाकी गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने जामखेड येथिल खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.       या अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे निधन झाले तर त्याच्या गाडीमध्ये आसलेले त्यांची पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय 52, सुन जागृती भुषण बोरा वय 28, नात (मुलगी) लियाशा भुषण बोरा वय 6 हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्या नंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. तर त्यांचा मुलगा भुषण शांतिलाल बोरा वय 34 हा किरकोळ जखमी असल्याने उपचार घेऊन सोडण्यात आले आहे. मयत महेंद्र बोरा यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास तपनेश्वर अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात