कारची मोटारसायकलला धडक; मुलगा जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 14:38 IST2020-07-19T14:38:07+5:302020-07-19T14:38:18+5:30
मोटारसायकलवर रस्ता ओलांडत असताना कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (१८ जुलै) रात्री झाला.

कारची मोटारसायकलला धडक; मुलगा जागीच ठार
काष्टी : मोटारसायकलवर रस्ता ओलांडत असताना कारची धडक लागून झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर सांगवी फाटा येथे शांताई मंगल कार्यालयाजवळ शनिवारी (१८ जुलै) रात्री झाला.
निवृत्ती नागनाथ पवार (वय १३, रा.सांगवी फाटा) असे या अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. नगरकडून बारामतीकडे जाणाºया कारने (क्रमांक एम.एच.४२, ए.एक्स.-७६७७) मोटारसायकलवर रस्ता ओलांडून जाणाºया निवृत्ती पवार याच्या गाडीला धक्का दिला. निवृत्ती हा आपल्या घरी पाणी आणायला गेला होता. निवृत्ती हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.