नगरचे सुपुत्र व उद्योजक सौरभ बोरा यांची तिरुमला तिरुपती देवस्थानच्या सदस्यपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 16:32 IST2021-09-16T16:31:14+5:302021-09-16T16:32:24+5:30
आंध्रप्रदेश सरकारची घोषणा

नगरचे सुपुत्र व उद्योजक सौरभ बोरा यांची तिरुमला तिरुपती देवस्थानच्या सदस्यपदी निवड
नगर– आंध्रप्रदेश सरकारने नुकतीच तिरुमला तिरुपती देवस्थानच्या नूतन अध्यक्ष व २८ सदस्यांची घोषणा केली आहे. नूतन कार्यकारणीत नगरचे सुपुत्र व उद्योजक सौरभ बोरा यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
उद्योजक सौरभ बोरा हे तिरुपती बालाजी भगवंताचे नित्सिम भक्त आहेत. ते सध्या मुंबई येथे स्थाईक असून विविध सामाजिक कामात सतत सहभागी असतात. त्यांची तिरुमला तिरुपती देवस्थानच्या सदस्य पदी निवड झाल्याची बातमी आज सकाळी नगर पोहचल्यावर त्यांच्यावर मित्रमंडळींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. शहरात व सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात याबद्दल चर्चा होत आहे.