दरवाजा उचकटून वस्तीवर चोरी, तिघा आरोपींना अटक
By अण्णा नवथर | Updated: November 25, 2023 17:38 IST2023-11-25T17:37:43+5:302023-11-25T17:38:30+5:30
या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी केला.

दरवाजा उचकटून वस्तीवर चोरी, तिघा आरोपींना अटक
अण्णा नवथर, अहमदनगर: शेतात असलेल्या वस्तीवरील घराचा दरवाजा तोडून मारहाण करत सुमारे दोन लाख रुपये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. २४ ) अटक केली आहे.
अनिकेत विलास हुलावळे ( वय १९ वर्षे, रा. गाड्याचा झाप,पळशी, ता. पारनेर ), गणमळ्या संदील चव्हाण ( रा. वासुंदे ता. पारनेर ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील पळशी येथील प्रभाकर अण्णा गागरे यांच्या वस्तीवर आरोपींनी दरोडा टाकला. शुक्रवारी (दि. १७) रोजी रात्री दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात प्रभागकर गागरे यांच्यासह कुटुंब झोपलेले हाेते. त्यांना मारहाण करत चोरट्यांनी २ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम चोरी नेली. याबाबत गागरे यांनी पारनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी केला.
तांत्रिक विश्लेषणात सदरचा गुन्हा वरील आरोपींनी केल्याचे पुढे आले. आरोपींचा शोध घेत असताना ते पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर येथे असल्याची माहिती मिळाली.त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने ढाकळीढोकश्वर येथे सापळा रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकले. ही कारवाई पोलिस निरिक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पाेलिस उपनिरिक्षक सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे आदींच्या पथकाने केली.