शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

अहमदनगरमध्ये भाजपच्या स्मार्ट सिटीचा फुगा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 18:40 IST

सेना-भाजपच्या मातब्बरांचा पराभव : शिवसेना एक क्रमांकवर, तर राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी

सुदाम देशमुखअहमदनगर : स्मार्ट सिटी आणि महापौर झाला तर तिनशे कोटी रुपये देण्याच्या आश्वसनांचा फुगा नगरकरांनी मतपेटीच्या माध्यमातून फोडला. केडगाव हत्याकांडानंतर नगरला भयमुक्त करण्याचा नारा देणा-या शिवसेनेलाच मतदारांनी कौल दिला. पहिल्या क्रमांकावर राहण्याची शिवसेनेने आपली परंपरा कायम राखली.महापालिकेसाठी रविवारी मतदान झाले. गत पंचवार्षिकपेक्षा चार ते पाच टक्क्यांनी मतदान कमी झाले होते. कमी मतदानाचा अर्थातच भाजपला फटका बसला. ७२ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले असते तर कदाचित भाजपला त्याचा लाभ झाला असता. मात्र कोणालाही निवडून द्या, शहरात विकास होत नाही, अशी ओरड नागरिकांमधून होते. त्याचा फटका मतदानाच्या माध्यमातून बसला. भाजपने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रचार केला. महापालिका निवडणुकीत भाजप प्रथमच स्वबळावर निवडणूक लढला. त्यामुळे ६८ जागाांवर भाजपने उमेदवार दिले असले तरी त्यासाठी भाजपची दमछाक झाली. भाजपकडे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार नव्हते. इतर पक्षातील २३ उमेदवार भाजपमध्ये आले. ९ पैकी ७ विद्यमान उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामध्ये फक्त दोनच विद्यमान नगरसेवक निवडून आले, तर चार उमेदवारांना पराभवाचा झटका बसला.भाजपने संकल्पनामा प्रसिद्ध केला. स्मार्ट सिटीचे वचन दिले, मात्र त्याचा फारसा प्रभाव मतदारांवर पडला नाही. केडगाव हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार धास्तावले होते. त्यामुळे त्यांनी सुप्तपणे प्रचार केला. शिवसेनेने घरोघरी मतदारांशी थेट संपर्क केला. त्याचा फायदा त्यांना क्रमांक एकपर्यंत घेवून गेला. विकासापेक्षा मतदारांनी शिवसेनेच्या भयमुक्तीला पसंती दिली.

मातब्बरांचा पराभव

भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, किशोर डागवाले, महेश तवले, उषा नलवडे यांचा पराभव झाला. शिवसेनेचे पहिले महापौर भगवान फुलसौंदर आणि शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचाही पराभव झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष दीप चव्हाण यांचा पराभव झाला, मात्र त्यांच्या पत्नी शीला चव्हाण निवडून आल्या.

यांचा विजय

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादीतील दोन्ही कन्या विजयी झाल्या. महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे हे पुन्हा निवडून आले. महापालिकेचे सभापती बाबासाहेब वाकळे (भाजप), सभागृह नेते गणेश कवडे उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या पत्नी पुष्पा बोरुडे, महिला व बालकल्याम समितीच्या सभापती सारिका भूतकर (शिवसेना) हे सर्व निवडून आले.

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस