बु-हाणनगर योजनेचे पाणी चिचोंडीपर्यंत आणू-बबनराव पाचपुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 17:21 IST2019-10-17T17:20:49+5:302019-10-17T17:21:01+5:30
नगर तालुक्यातील बु-हाणनगर योजनेचे पाणी टाकळी काझीपर्यंत येते. ते पुढे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांना देण्यासाठी सुधारित आराखडा तयार करणार आहे. चिचोंडी पाटीलसह परिसरातील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिले.

बु-हाणनगर योजनेचे पाणी चिचोंडीपर्यंत आणू-बबनराव पाचपुते
अहमदनगर : नगर तालुक्यातील बु-हाणनगर योजनेचे पाणी टाकळी काझीपर्यंत येते. ते पुढे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांना देण्यासाठी सुधारित आराखडा तयार करणार आहे. चिचोंडी पाटीलसह परिसरातील गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिले.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गटात पाचपुते यांनी प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. पाचपुते म्हणाले, लोकसभेत भाजपचे सरकार असून विधानसभेलाही युतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे साकळाई योजनाही मीच पूर्ण करणार आहे. बु-हाणनगर पाणी योजनेचे पाणी चिचोंडी पाटील, दशमीगव्हाण, सांडवा, मांडवा, आठवड आदी उर्वरित गावांसाठी देण्यासाठी नव्याने प्रस्ताव करू. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, उपसभापती प्रवीण कोकाटे, सेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत, पंचायत समिती सदस्य संदीप गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू सदाफुले, माजी सरपंच शंकर पवार, उपसरपंच महेश जगताप, बबन शेळके, माजी पंचायत समिती सदस्य पोपट निमसे, बाळासाहेब ठोंबरे, राजू कोकाटे, युवा मोर्चाचे मनोज कोकाटे आदी उपस्थित होते.
कर्डिलेंचे कार्यकर्ते प्रचारात..
आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपल्या निवासस्थानी नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पाचपुते यांच्या मागे ताकद उभी करण्याची सूचना केली. हा आदेश पाळत कर्डिले यांचे कार्यकर्ते आता पाचपुते यांच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसत आहेत.