कारची काच फोडून दहा तोळे दागिने लंपास
By Admin | Updated: February 3, 2024 10:40 IST2014-09-11T23:12:49+5:302024-02-03T10:40:40+5:30
अहमदनगर : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून गाडीतील हॅण्ड बॅगमधील दहा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरले.

कारची काच फोडून दहा तोळे दागिने लंपास
अहमदनगर : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून गाडीतील हॅण्ड बॅगमधील दहा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरले. ही घटना सक्कर चौकातील बडीसाजन मंगल कार्यालयासमोर बुधवारी (दि.१०)रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी ज्ञानदेव हरिभाऊ बोडखे (रा. सुरत) हे काही कामानिमित्त नगरला त्यांच्या कारमधून आले होते. त्यांची कार बडीसाजन कार्यालयाजवळ पार्किंगला लावून ते आनंदऋषि हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले. त्यानंतर चोरट्यांनी कारच्या काचा फोडून बॅगमधील दहा तोळे सोन्याचे दागिने, रुद्राक्षांच्या माळा लंपास केल्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)