दहीहंडी फोडून श्रीरामनवमी उत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:22 IST2021-04-23T04:22:14+5:302021-04-23T04:22:14+5:30
सकाळी मंगलस्नान व काकड आरतीनंतर साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व वैशाली ठाकरे यांच्या हस्ते गुरुस्थान ...

दहीहंडी फोडून श्रीरामनवमी उत्सवाची सांगता
सकाळी मंगलस्नान व काकड आरतीनंतर साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व वैशाली ठाकरे यांच्या हस्ते गुरुस्थान मंदिरात रूद्राभिषेक पूजा करण्यात आली. यावेळी मंदिरप्रमुख रमेश चौधरी व मंदिराचे पुजारी उपस्थित होते.
यानंतर समाधी मंदिरात मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रतीक्षा घोरपडे यांच्या हस्ते समाधीवर पाद्यपूजा करण्यात आली.
दासगणुंवर साईबाबांनी १९१५ साली रामनवमीतील कीर्तनाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून दासगणू व त्यांच्यानंतर त्यांच्या परंपरेतील कीर्तनकार ही जबाबदारी सांभाळत आहेत. यासाठी दरवर्षी नांदेडजवळील गोरट्यावरून कीर्तनकार येतात. कोरोनामुळे कीर्तनकार न आल्याने मंदिराचे सकाळी दहा वाजता मंदिरातील कर्मचारी संभाजी तुरकणे यांनी गोपाळकाल्याचे कीर्तन केले. या कार्यक्रमाचा समारोप मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, संरक्षण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आण्णासाहेब परदेशी, मंदिरप्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही श्रीरामनवमी उत्सव साध्या पद्धतीने मात्र रुढी परंपरेनुसार साजरा करण्यात आला.
२२शिर्डी रामनवमी